व्होटर हेल्पलाईन मतदारांच्या साथीला

कोल्हापूर : नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं आणि लोकशाहीच्या पर्वात सहभागी व्हावं, यासाठी निवडणूक आयोगाद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं आता मोबाईलवर मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 

 

 

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जाहीर झाली आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं आणि लोकशाहीच्या पर्वात सहभागी व्हावं, त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानंदेखील कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं आता मोबाईलवर मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदान केंद्र शोधताना ऐनवेळी गोंधळ होऊ नये, म्हणून आयोगानं हे पाऊल उचललं आहे. निवडणूक आयोगाच्या ‘व्होटर हेल्पलाइन’ या अॅपवर तुम्हाला मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र लगेच शोधता येणार आहे.

‘व्होटर हेल्पलाइन’ अॅपवर मतदान यादीतील नाव आणि मतदान केंद्र कसं शोधायचं?
सर्वांत आधी प्ले स्टोअरमधून ‘व्होटर हेल्पलाईन’ हे अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर तुम्ही नवीन युजर असाल, तर सर्वांत आधी न्यू युजरवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा. किंवा तुम्ही गेस्ट युजर म्हणूनही लॉगिन करू शकता. लॉगिन केल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला ‘search your name in electoral roll’ असा एक सर्च बॉक्स दिसेल. त्यावर क्लिक करा. सर्च बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मतदान यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी चार पर्याय मिळतील. पहिला पर्याय म्हणजे तुम्ही मोबाईल क्रमांक टाकून तुम्ही तुमची माहिती मिळवू शकता. त्याशिवाय तुम्ही मतदान कार्डावरील क्यूआर कोड स्कॅन करू शकता. तसेच तुमची वैयक्तिक माहिती भरून किंवा मतदान कार्डावरील EPIC क्रमांक भरून, तुम्हाला मतदान यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल.

व्होटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक :गुगल प्लेस्टोअरमध्ये-
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen&hl=mr&pli=1

ॲपल स्टोअर https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

टोल फ्रि क्रमांक – 1950 ही करेल मदत
तुमचा मतदार आयडी क्रमांक 1950 या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर आपल्याला केवळ 15 सेकंदात मतदार म्हणून नोंद असलेली बूथ स्लीप मिळेल. मतदानाला जाताना आपल्याजवळ ही स्लीप असावी, जेणेकरून आपल्याला सहज मतदान करता येईल. त्यामुळे मतदान केंद्रावर जाउन मतदान बूळ स्लीप घेण्याची गरज भासणार नाही. ज्यांना स्लीप मिळाल्या नाहीत त्या मतदारांसाठी हा सोपा एस.एम.एस.चा पर्याय उपलब्ध झालेला आहे.