कोल्हापूर: हातकणंगले विधानसभा निवडणुकी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार.आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्या प्रमुख उपस्थित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी मेळावा वडगाव येथे संपन्न झाला. यावेळी खासदार राजू शेट्टी बोलताना म्हणाले आमदार डॉ मिणचेकर याचे स्वतःच संघटन व आपल्या संघटनांची ताकत मोठी आहे. गेल्यावेळी ज्यांना निवडून दिले त्यांना आपला हळू हळू विसर पडत गेला हे आपल्याला माहीत आहे. आपल्याला स्वाभिमानी विचाराचा आमदार हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पाठवायचा आहे. यासाठी आपण सर्वांनी कामाला लागायचे आहे . यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या गावा गावात प्रचाराला लागण्यास सांगितले. आज पर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आपण लढा दिला आहे हे सर्वांना सांगा.
मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर बोलताना म्हणाले २०१४ साली निवडणुकीत राजू शेट्टी साहेब यांच्या प्रचारात आपण सोबत काम केले असल्याने ओळख सर्वाची आहेच यामुळे माझी ओळख नव्याने करून देण्याची गरज नाही.कार्यकर्त्यांनी माझा फॉर्म भरण्यासाठी कमी वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून माझा उमेदवारी अर्ज भरला.मा.खासदार राजू शेट्टी साहेब,स्वराज्य संघटना तसेच प्रहार संघटनेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अर्ज भरला.माझा गेल्या वेळी थोडक्यात पराभव झाला असला तरी तो आपण यावेळी तो भरून काढणार यात काही शंका नसल्याचे सांगितले. येणाऱ्या 23 तारखेला आपलाच विजय असल्याचे सांगितले.
यावेळी मा.सभापती प्रवीण यादव, मा. सभापती राजेश पाटील,राजाराम देसाई आण्णा,आप्पासाहेब एडके ,अरुण मगदूम, धनाजी पाटील ॲड. सुधीर पाटील, सुशील पाटील, जोगजे साहेब तसेच शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.