शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या नौटंकी व दलबदलू  आबिटकरांना वेळीच रोखा : के. पी. पाटील यांचा आरोप

सरवडे : गरीब शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावाखाली उभारलेल्या पाटगाव मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो हेक्टर ओलीताखाली आलेल्या पाण्यावर अदानी कंपनीशी हातमिळवणी करत पाण्याचा हिस्सा देण्याचा घाट घालत गरीब शेतकऱ्यांचे पाणी उद्योगपतींना विकणारा आमदार पाणीदार कसा? असा सवाल करत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आमदार प्रकाश आबिटकरांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीत वेळीच रोखा, असे आवू माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. ते नरतवडे ( ता. राधानगरी)येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते .

फत्तेसिंग भोसले पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी पाटील पुढे म्हणाले , हा मतदार संघ डोंगर भागात वसला असुन येथील शेतकरी अल्पभुधारक आहे . त्यातच विकासाच्या नावाखाली शक्तीपिठ महामार्ग माध्यमातुन , पाटगाव प्रकल्पावर अदानी कंपनीला पाण्याचा हिस्सा देण्याचा करार  करून विकासाच्या नावाखाली टक्केवारीच्या माध्यमातुन स्वतःचा विकास करणारा , शेतकऱ्यांची दिशाभुल करणाऱ्या आमदाराची येत्या निवडणुकीत हेच शेतकरी, त्यांना जागा दाखवत  घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत .आदानीला पाणी देण्याच्या करारावर भविष्यात शेतकऱ्यांना पाण्यासाठी आणिबाणी करण्याची वेळ येऊ न देण्यासाठी अशा नौटंकी आमदाराला वेळीच जागा दाखवण्याचे आव्हान यावेळी केले.
यावेळी भिकाजी एकल म्हणाले, शिवसेनेतून गद्दार ठरलेल्या आमदारांना रोखण्यासाठी तालुक्यातील निष्ठावंत सैनिक जिवाचे रान करतील व के. पी. पाटील यांच्या विजयानंतरच आपल्या प्रयत्नांना पुर्णविराम देतील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी प्रा. किसन चौगले,विनय पाटील, यांची भाषणे झाली.यावेळी प्रसंगी राजू भाटळे, राजेंद्र पाटील, फिरोज खान पाटील,उमेश भोईटे,दिपक किल्लेदार,जयवंत पाटील,दिपक पाटील,एम. एन. पाटील, पुंडलिक पाटील आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .

अदाणींच्या व्यवसायासाठी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा हा कुठला प्रकार ?

माजी आमदार के पी पाटील यांनी आक्रमक होत आबिटकरांना सवाल उपस्थित केला. ते म्हणाले,”पाटगाव प्रकल्पाचे पाणी आदानींच्या पॉवर हाऊसला देऊन पुढे कोकणात नेण्याचा आबिटकरांनी कुटील डाव रचला होता. आमच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी अदाणींच्या दावणीला बांधण्यासाठी यांचा किती व्यवहार ठरला होता हे केवळ त्यांनाच माहीत. पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवण्याचा हा कुठला प्रकार ? याचा हिशोब या निवडणुकीत त्यांना द्यावाच लागेल.”

🤙 8080365706