मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ठाणे येथील ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला उपस्थिती

ठाणे : नरक चतुर्दशीच्या सणानिमित्त ठाणे शहरातील रहेजा कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी_पहाट कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून त्यांनी नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

 

 

गेल्या दोन वर्षात सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सुखाचे क्षण यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. ही योजना राज्यात सुपरहिट झालेली आहे. ठाण्यातील नागरिकांना दिलेला शब्द पाळत त्यांची कायमस्वरूपी टोल मधून मुक्तता केल्याचे सांगितले. या गृहसंकुलात अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांना देखील शासनाला एखादी गोष्ट सुचवायची असल्यास त्यांनी सुचवलेल्या सुधारणांचा नक्की विचार करू असेही याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच सर्वांना दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका सौ.नम्रता भोसले जाधव आणि लक्ष्मण कदम तसेच रहेजा कॉम्प्लेक्समध्ये राहणारे सर्व रहिवाशी उपस्थित होते.

🤙 8080365706