मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मोठ्या मताधिक्यांच्या विजयासाठी महायुतीचा धर्म पाळणार : गडहिंग्लज कार्यकर्त्यांचा निर्धार

कागल : पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सर्वसामान्य जनतेचे कर्तबगार नेते आहेत. विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या मोठ्या मताधिक्यांच्या विजयासाठी महायुतीचा धर्म काटेकोर पाळणार असल्याचा निर्धार गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सदस्य व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, भाजपाचे गडहिंग्लज तालुका सरचिटणीस अजित जामदार, माजी ग्रामपंचायत सदस्य अभिजीत देसाई -मिणचेकर, सामाजिक कार्यकर्ते वसंत पाटील यांनी व्यक्त केला.

 

 

आज या सर्वांनी कागलमध्ये हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन मोठ्या मताधिक्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या.मुश्रीफ यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले व हरेक परिस्थितीत खंबीरपणे आपणा सर्वांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही दिली.