अशोक मानेंनी घेतली राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट

कोल्हापूर: हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अशोक माने यांनी जयसिंगपूर येथे शरद साखर कारखान्याचे चेअरमन मा.मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. तसेच महायुतीतून शिरोळ विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र पाटील यड्रावकरांची देखील उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांचा हातकणंगले मतदारसंघात त्यांना मानणारा वर्ग संपूर्ण ताकदीने महायुतीच्या मागे भक्कम पणे उभा आहे अशी ग्वाही मा.राजेंद्र पाटील यड्रावकार यांनी दिली.

 

 

तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष तथा मा.जि.प. सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली..
तसेच आळते येथे भाजपचे ज्येष्ठ नेते मा.जि.प.सदस्य अरुणरावजी इंगवले यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने , भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, जि.प.चे मा.सदस्य प्रसाद खोबरे, मा. नगराध्यक्षा नीता माने, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील,राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, वडगांव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील,विश्वास माने,अरविंद माने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545