कोल्हापूर : प्रकाश आबिटकर यांनी समाज व बेरोजगार तरुणांसाठी काय केले? कोणते प्रकल्प उभा केलेत? कोणते प्रकल्प चांगले चालवलेत? याचा लेखाजोखा जनतेसमोर त्यांनी मांडावा आणि मगच मत मागण्याची याचना करावी. ज्यांच्यासमोर विकासाचा कोणताही मुद्दा नाही असे समाजकर्ते जनतेच्या काय कामाचे ? असे मत माजी आमदार के.पी.पाटील यांनी व्यक्त केले.ते दारवड (ता.भुदरगड) येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आयोजित बैठकीत बोलत होते.
यावेळी स्वागत प्रकाश पाटील यांनी केले.तर भिमराव पोवार यांनी प्रास्ताविक केले.अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई होते.
पाटील पुढे म्हणाले, विकास कामाच्या विचारावर चालणारा मी कार्यकर्ता. आबिटकरांनी असे कोणते प्रकल्प उभा केले ?आपण समाजासाठी काय केले? आपला जाहीरनामा काय ?असा कोणताही विचार नसणारे फक्त स्वार्थासाठी समाजकारणात तिसऱ्यांदा आमदार होण्याची दिवा स्वप्ने पाहणा-या आबिटकरांना जनता या निवडणुकीमध्ये धडा शिकवील.ही लढाई आता एका के.पी. पाटील यांची नाही तर धर्मनिरपेक्ष विचारसरणीला चालना देणाऱ्या पुरोगामी विचारांची आहे.आपण चांगल काम करू शकतो याचा विश्वास जनतेने यापूर्वी दोन वेळा दिला आहे. विकासाची नांदी अशीच पुढे चालत ठेवण्यासाठी जनतेने अशा भूलभूल्लयांना बळी न पडता चांगले काय ?याचा विचार करून मला साथ द्यावी.आपण सर्वांनी पुन्हा मला आशीर्वाद द्यावेत. असे आवाहन यावेळी के. पी.पाटील यांनी केले.माझ्या २००५ ते २०१४ या माझ्या आमदारकीच्या कालखंडात झालेली विकासकामे आजही भक्कम स्वरुपात आहेत.मी आयुष्याच्या शेवटपर्यंत मतदार संघातील जनतेसाठी काम करणार.असे ही ते यावेळी म्हणाले
बिद्री संचालक मधुआप्पा देसाई म्हणाले,के.पी.पाटील यांनी समाजकारणातून सामान्य जनता हाच केंद्रबिंदू मानून काम केले. म्हणूनच बिद्री साखर कारखाना, हुतात्मा स्वामी सुतगिरण चांगल्या प्रकारे चालवून सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठे प्रयत्न केलेत. त्याचबरोबर राधानगरी विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात रचनात्मक विकास साधण्यात मी लक्षणीय यश मिळवले सत्तेच्या माध्यमातून मोठ्या समन्वयातून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला.याउलट मतदार संघात गेल्या दहा वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी आणून मतदारसंघाचा विकास केला अशी खोटी वल्गना करणा-या लबाड आमदारांना या निवडणुकीत धडा शिकवा.
मेळाव्याप्रसंगी संदिप हळदकर,प्रा.एच.आर.पाटील,के.ए.पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
या प्रसंगी यावेळी विठ्ठल कांबळे , राजेंद्र पाटील , ए. व्ही. पाटील , बाबुराव देसाई , मनोहर सुतार , एन. डी. कुंभार , शंकरराव पाटील , अशोक चौगले , रणजीत पाटील ,फत्तेसिंह भोसले – पाटील , उमेश भोईटे , रामभाऊ चौगुले , अशोक कांबळे आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार अभिजित पोवार यांनी केले.