राजूबाबा आवळेंची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्यासोबत हातकणंगले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली.

 

 

हातकणंगले तालुक्याच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष जोमाने तयारीला लागले असून सर्वांना सोबत आणि विचारात घेऊनच भविष्यात आपण काम करणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

तसेच महाविकास आघाडीच्या विजयासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकजुटीने कार्यरत राहतील असा विश्वास राजूबाबा आवळे व पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

🤙 9921334545