इंडियन कॉमर्स असोसिएशनकडून डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचा फेलो म्हणून सन्मान

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य  व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राडॉश्रीकृष्ण महाजन यांना त्यांच्या वाणिज्य  व्यवस्थापन क्षेत्रातील योगदानाबद्दल इंडियन कॉमर्स असोसिएशनने फेलो म्हणून सन्मानित केले आहेउदयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ७५ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेत गुरू गोविंद जनजातीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉव्हीकेमाथूर यांच्या हस्ते प्रामहाजन यांचा सन्मान करण्यात आलात्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात वाणिज्य  व्यवस्थापन विषयामध्ये केलेले अध्ययनअध्यापनसंशोधन  विस्तारकार्य याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.

 

 

प्रा. महाजन यांनी अकौंटन्सी  फायनान्स या विषयांचे अध्यापन केले आहेअकौंटन्सीफायनान्सउद्योजकता विकासकाजू प्रक्रिया  अन्न प्रक्रिया उद्योगग्रामीण व्यवस्थापन या विषयांवर संशोधन केले आहेविद्यापीठ अनुदान आयोगभारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद तसेच शिक्षण मंत्रालयाच्या इम्प्रेस या योजनेचे अनुदान त्यांच्या संशोधन प्रकल्पांना प्राप्त झाले. उद्योजकता विकास  वित्तीय समावेशन या विषयावर हे संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत२० विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी.चे संशोधन पूर्ण केले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांच्या संदर्भात त्यांनी महाराष्ट्रभर अनेक व्याख्याने दिली आहेतत्या अनुषंगाने विद्यापीठीय धोरण निर्मितीमध्येही त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहेअकौंटन्सी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यासाठी आग्रहपूर्वक प्रयत्न केलेकुलगुरू  प्र-कुलगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली एमबीऑनलाइनबीकॉम. (बी.एफ.एस.आय.)  बीबी. – एमबी(इंटिग्रेटेड) असे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.