कोल्हापूर: कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली असून कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता राजेश विरुद्ध राजेश अशी लढत पहायला मिळणार आहे.

कोल्हापूर उत्तरमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी लांबणीवर पडली होती. शनिवारी रात्री काँग्रेसकडून अधिकृतपणे राजेश लाटकर यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. लाटकर यांची उमेदवारी जाहीर होताच शहरात ठिकठिकाणी फटाके उडवून स्वागत करण्यात आले. लाटकर यांनी नगरसेवक, स्थायी समिती सभापती म्हणून काम केले आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.
राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांची लढत आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याबरोबर होणार आहे.
