कोल्हापूर : राधानगरी मतदार संघात शिवसेनेने मा आम के.पी.पाटील यांच्या सारख्या चांगल्या सुसंस्कृत .व अभ्यासू नेतृत्वाला उमेदवारी देवून उ बाठा सेनेत नवं चैतन्य निर्माण केले आहे.आता उद्धव साहेबाचा सांगावा घराघरात धाडा . . अन राधानगरीच्या गद्दाराला गाडा असा सूचक इशारा प्रा सुनिल शिं त्रे दिला ते आम. व्हरवडे ता. राधानगरी .येथे शिवसेना उबाठा मेळाव्याप्रसंगी बोलत होते.प्रास्ताविक व स्वागत राधानगरी तालूका प्रमूख बाबासाहेब पाटील यांनी केले.

यावेळी प्रा . शिंत्रे पुढे म्हणाले के.पी.पाटील यांचे सहकारातील काम चांगले असून साखर कारखानदारीत त्यांचे नांव राज्यात चर्चेत आहे राधा नगरीची भुमी राजर्षि शाहू महाराजांच्या संस्कारानी घडलेली आहे. या भुमीत गद्दारांना कायमचे घरी बसवून निष्ठेच्या विचारांना व आत्म सन्मानाला योग्य न्याय मिळवून देण्याचे अवाहन त्यांनी केले.
यावेळी के. पी. पाटील बोलताना म्हणाले गुहाव टीच्या गद्दारीच्या खेळात आम अबिट करांनी आपली निष्ठा विचार आणि शिव सेनेचा आदर सोडून सत्तेसा ठी वाममार्गाची वाट धरली गद्दारी आणि सत्तेच्या स्वार्थासाठी बाळासाहेब ठाकरेचे विचार फेकणाऱ्या अशा नेत्याचा उघड निषेध जनतेतून होत आहे. शिव सेनेच्या नेतृत्वाखाली जनतेने गद्दारीच्या विरोधात मला उमेदवारी दिली आहे या गद्दाराला योग्य जागा दाखविण्यासाठी मतदारसंघातील सर्वच मावळे एकवटले आहेत आता त्यांचा पाडाव दूर नसल्या चे स्पष्ट केले.
यावेळी रविकीरण इंगवले सुरेशराव चौगले संभाजीराव भोकरे दिलीप माने एम.एन. पाटील बापूसो किल्लेदार अवधूत पाटील यांची मनोगते झालीत यावेळी प्रा . किसन चौगले भिकाजी एकल . अजित खोत प्रसाद पिल्लारी संदीप चव्हाण सुषमा पाटील विमल पाटील यांच्या सह सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार सागर भावके यांनी मानले
उद्धव सेना गद्दारांची लंका दहन करणार
राज्यात मातोश्रीशी फारकत घेऊन आर्थिक लोभापाई गुवाहटीला पळालेल्या रावण रुपी गद्दारांना उद्धवसेना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मातोश्रीच्या आशिर्वादावर मोठे झालेल्या गद्दारांना गाडण्याची हिच योग्य वेळ असल्याचे प्रा. शिंत्रे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली.
