राहुल पाटील यांना करवीरमधून उमेदवारी मिळाल्याने सडोलीत रॅली काढून आनंदोत्सव

 

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून राहुल पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्यावर सडोली खालसा गावी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.रॅलीमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि करवीर मतदार संघातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता करवीर विधानसभेचा गुलाल काँग्रेसचाच असणार हा विश्वास दृढ झाला,असे मत राहुल पाटील यांनी व्यक्त केले.

 

 

यावेळी राहुल पाटील म्हणाले, सध्याच्या काळात असलेली महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या ,वाढत चाललेली बेरोजगारी अशा अनेक समस्या सर्वसामान्य जनतेला सतावत आहेत.येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता आल्या नंतर सामान्य नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवण्याच्या जबाबदारीची जाणीव गावातील लोकांशी संवाद साधताना पुन्हा एकदा झाली.त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कायम तत्पर राहीन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ह्या रॅलीमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून तेजस्विनी राहुल पाटील,शेतकरी कामगार पक्षाचे क्रांतिसिंह पवार,बाबासाहेब देवकर, के.बी.पाटील,भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील,अ‍ॅड.शाहू काटकर,माजी जिल्हा परिषद सदस्य भरत मोरे,भोगावतीचे आजी-माजी संचालक,परिते जिल्हा परिषद, सांगरूळ जिल्हा परिषद मधील आजी-माजी पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.तसेच सडोली गावचे सरपंच अमित पाटील हे देखील उपस्थित होते.