मुरगुडच्या सुनील कांबळेंसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

कागल : मुरगुड, ता. कागल येथील सुनील कांबळे यांनी आपल्या समर्थकांसह समरजीत घाटगे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मुरगूड मध्ये या निमित्ताने समरजीत घाटगे गटाला खिंडार पडले आहे.

 

कागल येथील मंत्री मुश्रीफ यांच्या निवासस्थानी भेट घेऊन या पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी समरजीत घाटगे गटाची सोशल मीडिया प्रमुख सुनील कांबळे म्हणाले, मी गेल्या चार ते पाच वर्षापासून समरजीत घाटगे गटाचे काम करत आहे. परंतु आम्हाला तेथे योग्य न्याय मिळाला नाही, मात्र मंत्री मुश्रीफ यांनी तालुक्यामध्ये प्रचंड विकास कामे केली आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. म्हणूनच तेउण या तालुक्याचे पुन्हा एकदा आमदार होणे गरजेचे असल्याने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण यापुढे काम करणार आहोत.

मंत्री हसन मुश्रीफ यांनीही मोठ्या मनाने त्यांचे स्वागत केले. प्रवेश केलेला सर्वच कार्यकर्त्यांचा योग्य मान-सन्मान ठेवला जाईल, त्यांना आमच्या गटातून चूक केली असं कधीही वाटणार नाही. या पद्धतीने आमचे कार्यकर्तेही त्यांचा आदर ठेवतील. प्रवेश केलेल्यांमध्ये युवा कार्यकर्ते सुनील कांबळे यांच्यासह अनिल कांबळे, गौतम कांबळे, जीवन कांबळे, अविनाश कांबळे, गिरीश कांबळे, रणजीत कांबळे, दिग्विजय शिंदे, वैभव कांबळे, पारस कांबळे, सौ. करुणा कांबळे, सौ. अनुराधा कांबळे, गणेश कांबळे यांचा समावेश होता यावेळी रणजीत सूर्यवंशी, डॉ. सुनील चौगुले, युवराज सूर्यवंशी, सत्यजित चौगुले, विकी बोरगावे, सुनील परसू कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.