महायुतीच्या नेत्यांचा विश्वास कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील जनता नक्कीच साध्य करून दाखवेल : धनंजय महाडिक

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार अमर महाडिक यांचा उमेदवारी अर्ज हजारो कार्यकर्त्यांचे उपस्थिती दाखल करण्यात आला. यावेळी धनंजय महाडिक उपस्थित राहून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

 

 

यावेळी धनंजय महाडिक म्हणाले,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमल महाडिक यांना उमेदवारी मिळाली आहे. महायुतीच्या या नेत्यांचा विश्वास कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील जनता नक्कीच साध्य करून दाखवेल असा विश्वास आहे.

राज्यातील महायुती सरकार हे लोक उपयोगी सरकार म्हणून ओळखले जात आहे. लोककल्याणाच्या हितासाठी महायुती सरकार रात्रंदिवस कष्ट करत आहे. हे राज्यातील जनतेने ओळखले आहे. यामुळे निवडणुकीमध्ये देखील जनता महायुती सरकारलाच निवडून देईल, असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीची हजारो कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाले होते. हाच उत्साह २० नोव्हेंबर पर्यंत कायम ठेवूया व अमल महाडिक याना प्रचंड मताधिक्याने निवडून आणूया तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे हात बळकट करूया असे आवाहन धनंजय महाडिक यांनी केले.

यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, प्रा. जयंत पाटील ,अमल महाडिक, सत्यजित कदम,शौमिका महाडिक,महेश जाधव, मुरलीधर जाधव, आदिलभरात रूपाराणी निकम, अशोक देसाई, संदीप देसाई तसेच महायुतीचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते