कोल्हापूर : समरजीत घाटगे यांनी कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभा निवडणूक २०२४ चा फॉर्म भरला असून काल सायंकाळी मुरगूड येथील दत्त मंगल कार्यालययेथे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत परिवर्तन मेळावा संपन्न झाला.

याप्रसंगी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत आगामी काळात कागल, गडहिंग्लज आणि उत्तूरमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी निर्धार केला. यामुळे माझे मनोबल वाढले असून अंगात दहा हत्तींचे बळ संचारले आहे. ही लढाई स्वाभिमानी जनतेच्या स्वाभिमानाची असून या लढाईत विजय आपलाच असेल, यात शंकाच नाही, असे मत समरजीत घाटगे यांनी व्यक्त केले.
