उघड्यावर कचरा व खरमाती टाकलेबद्दल तीन हजार पाचशे रुपये दंड ; आरोग्य विभागाकडून कारवाई

कोल्हापूर : घरोघरी कचरा संकलनासाठी महानगरपालिकेने ॲटो टिप्पर वाहने उपलब्ध करुन दिलेली आहेत. तरी देखील काही नागरिक रस्त्यावर इतरत्र कोठेही कचरा टाकत असल्याचे आरोग्य विभागास निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागामार्फत गुरुवारी उघडयावर कचरा टाकणाऱ्या प्रभाग क्रमांक 34 शिवाजी उद्यम नगर जवळील सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौकात एका टेम्पो चालकाने उघड्यावर कचरा व खरमाती टाकत असल्याचे आरोग्य विभागास निदर्शनास आले. त्यामुळे आरोग्‍य विभागाने संबंधीत टॅम्पो चालकास जागेवरच रु.3000/- ची दंडात्मक कारवाई करुन त्याच्याकडून ही रककम वसूल करण्यात आली. त्याचबरोबर संभाजी नगर येथील म्हाडा कॉलनी येथे प्रेम सुरेश शिंदे यांनी उघडयावर कचरा टाकलेबद्दल त्यांना रु.500/- दंड करण्यात आला आहे.

 

 

सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक श्रीराज होळकर, विनोद नाईक, मुकादम अतुल सकटे व आरोग्य कर्मचारी यांनी केली.

तरी शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरातील दैनंदिन वापरातून निर्माण होणारा कचरा वर्गीकृतपणे करुन आपल्या भागात येणाऱ्या ॲटो टिपर वाहनांकडेच द्यावा. इतरत्र कुठेही कचरा टाकू नये. इतरत्र टाकलेचे महापालिकेस निदर्शनास आल्यास संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्या आहेत.