कागल : बाळेघोल, ता. कागल येथील बचाराम निवृत्ती जाधव, सुमित भैरू नडाळे, वैभव भैरु पाटील, अवधूत संजय पोवार, आनंदा बाबूराव पोवार, राहूल दत्तात्रय पोवार, संदीप आबा पाटील, संतोष पांडुरंग तिप्पे, अमरिश भिमराव जाधव, अरुण प्रकाश चव्हाण, युवराज मारुती धामणकर, युवराज राजाराम यादव, नितीन बंडा तिप्पे, संदीप एकनाथ कांबळे, आकाश निवृत्ती कांबळे, प्रवीण बळीराम थोरवत, विजय शिवाजी तिप्पे यांच्यासह प्रमुख कार्यकत्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे हार घालून व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाचे स्कार्प गळ्यात घालून पक्षात स्वागत केले.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, बाळेघोलच्या प्रमूख कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देणारा आहे. कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाच्या भावनेने पक्षप्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी मध्यरात्रीसुद्धा हाकेला ओ देऊन मी या सर्वांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहीन.
यावेळी सरपंच बाळासो खतकले, शामराव पाटील सर, शामराव तोडकर, स्वप्निल जाधव, शंकर माने, बजरंग तोरस्कर, नंदू यादव, जयसिंग चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
