करवीर तालुक्यातील कोथळी येथे महायुतीचा मेळावा

कोल्हापूर : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील कोथळी येथे महायुतीचा मेळावा पार पडला. यामध्ये प्रामुख्याने महायुतीचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रदीप नरके, अजित नरके, भाजपचे हंबीरराव पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे बाळासाहेब वाशीकर यांचे कार्यकर्ते , तसेच आसपासच्या गावचे विविध मान्यवर उपस्थित होते.

 

 

मेळाव्या दरम्यान कांचनवाडी , हासूर व इतर काही गावांतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. तथा चंद्रदीप नरके यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र मध्ये सुरू केलेल्या योजना लोकांसमोर सादर करून युतीचा करवीर मधला उमेदवार म्हणून आपले तिकीट हे फिक्सच आहे आणि वेळ आपलीच आहे असे म्हणत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडून देवून आपल्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली.

यावेळी या मेळाव्याचे अध्यक्षपद परितेच्या माजी सरपंच अक्काताई कारंडे यांनी भूषवले. परितेचे अजित पाटील यांनी प्रस्तावना सादर केली. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे मधुकर कांबळे, दत्ता कांबळे, यशवंत बँकेचे माजी चेअरमन एकनाथ पाटील, पुंडलिक पाटील, विक्रांत पाटील, भाजपाचे हंबीरराव पाटील, हसुरचे सदाशिव शामराव पाटील, कांचनवाडीचे प्रकाश पाटील यांनी भाषणे केली.