विधानसभेची निवडणूक लढविणारच : सुजित मिणचेकर

कुंभोज / प्रतिनिधी

शिवसैनिकांचा स्वाभिमान टिकवून ठेवण्यासाठी व शिवसैनिकांनी जाहीर केलेल्या पाठिंब्यावरच विधानसभेची निवडणूक लढवून निवडून येणारच असा विश्वास माजी आम . डॉ . सुजित मिणचेकर यांनी व्यक्त केला . शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते . मेळाव्याचे अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख संजय चौगुले होते.

 

 

डॉ. मिणचेकर म्हणाले, दहा वर्षाच्या आमदारकीच्या जीवावर अनेक शिवसैनिकांना विविध पदावर बसविण्याची संधी मिळाली . मी थांबलो तर शिवसैनिकांची ताकत थांबणार आहे . आपण दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळेच निवडणूक लढविण्यासाठी हत्तीचे बळ आले आहे . मागील पाच वर्षांमध्ये कोणत्याही शिवसैनिकाला कसल्याही उद्घाटनाचा नारळ फोडण्याची संधी मिळाली नाही .

जिल्हाप्रमुख संजय चौगुले म्हणाले , राजकारणात निष्ठा व शिवसैनिकाची व्यथा महत्त्वाची आहे . पक्षात राहून विरोध करतात तेच खरे पक्षाचे गद्दार आहेत . त्यांच्यामुळेच मागील निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागले आहे . पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने आघाडीधर्म पाळला आहे . मात्र अन्य पक्षांनी आघाडी धर्म पाळणा नसल्याचा आरोप करत उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागत आहे हे दुर्दैव आहे .

मेळाव्यात जि. प. चे माजी सभापती प्रवीण यादव , माजी जि . प . सदस्य महेश चव्हाण , पं .स .सदस्य पिंटू मुरुमकर, उदय शिंदे , भीमराव कांबळे , उमेश शिंदे , किसन तिरुपणकर, शरद पवार, सुनील माने, दिलीप पवार, विष्णू पाटील, सागर चोपडे, अंकुश माने, संभाजी हांडे, सुवर्णा धनवडे, भागवत शिंदे, बाबासाहेब शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी मनोगतातून पाठिंबा व्यक्त केला . यावेळी धोंडीराम जाधव , संदीपबाबा पाटील , उषाताई चौगुले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.