कोल्हापूर: अनाथ व गरीब विद्यार्थ्यांची संजीवनी असणाऱ्या सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्था, गगनबावडा येथील विद्यार्थ्यांना मिरजकर तिकटी येथे दिवाळीच्या औचित्यावर त्यांच्या भविष्याची जडणघडण होण्याकरिता राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर यांनी शैक्षणिक साहित्य दिले.
समाजाप्रती आपण काहितरी देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवून अनाथ, दिव्यांग तसेच गरीब घरातील मुलांना शक्य त्या प्रत्येकाने मदत करायला हवी. केलेल्या मदतीने मनाला समाधान तर मिळतेच शिवाय आपण केलेली ही मदत इतरांनाही स्फूर्ती देउन जाते.अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.