गती आणि प्रगती म्हणजे महायुती : प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात “महायुती” सरकारने मागील अडीच वर्षांच्या विकास कामांचा व लोकोपयोगी योजनांचा लेखाजोखा रिपोर्ट कार्डच्या स्वरूपात जनतेसमोर मांडला आहे. यासंबंधी पत्रकार परिषदेचे आयोजन गारगोटी, ता.भुदरगड, जि.कोल्हापूर येथील संपर्क कार्यालयात केले होते.

 

 

यावेळी प्रकाश आबिटकर म्हणाले,गती आणि प्रगती म्हणजे महायुती .राजकारण हे जनसेवेचे साधन आहे हे मानून सातत्याने लोकहिताचे, जनकल्याणाचे निर्णय घेणारे आमचे महायुती सरकार आहे. सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या, ज्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून सरकारने निर्णय घेतले. जनतेसमोर केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड मांडणारे हे महायुतीचे प्रामाणिक सरकार आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष नाथाजीराव पाटील, रिपाई गटाचे प्रदेश सचिव प्रा.शहाजी कांबळे सर, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, राहूरी कृषी विद्यापीठाचे सदस्य दत्तात्रय उगले, माजी सभापती बाबा नांदेकर, केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष शिवाजीराव ढेंगे, राधानगरी तालुका प्रमुख तानाजीराव चौगले, विजयराव बलुगडे, भुदरगड तालुका प्रमुख संग्रामसिंह सावंत, आजरा तालुका प्रमुख संजय पाटील, बाजीराव चव्हाण, आरपीआय तालुकाध्यक्ष नामदेव कांबळे, युवासेना तालुकाप्रमुख विद्याधर परीट, आजरा शहर प्रमुख विजय थोरवत, आमानुल्ला आगलावे, शहर प्रमुख रणधिर शिंदे यांच्यासह प्रमुख मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते.

 

🤙 9921334545