भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आवाडे निवासस्थानी भेट

कुंभोज (विनोद शिंगे)
महाराष्ट्र राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी इचलकरंजी येथे सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे , आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या इंदुकला निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

 

 

पक्ष संघटनाच्या बळकटीसाठी उपयुक्त सूचना करण्यात आल्या, तसेच मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला गेला. या चर्चेतून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, ज्यामुळे भाजपच्या कार्याची गती वाढविण्यास मदत होईल.

या विशेष भेटीच्या वेळी खासदार मा. धनंजय महाडिक, कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, भाजपचे ग्रामीण कोल्हापूर पुर्व जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर,. मोश्मी आवाडे वहिनी, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, चंद्रशेखर शहा, प्रकाश मोरे, सतीश मुळीक, महिला अध्यक्षा उर्मिला गायकवाड, नजमा शेख यांच्यासह आवाडे परिवार व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.