राज्यात महविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी कामाला लागा : राजुबाबा आवळेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री शैलजानाथ साठे हे हातकणंगले मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असता, आमदार राजूबाबा आवळे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला.

 

 

तसेच माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्यासोबत बुथ कमिटी मेळाव्याला उपस्थित व मतदार संघातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी राजूबाबा आवळे यांनी संवाद साधला.

यावेळी राजूबाबा आवळे म्हणाले, जयवंतराव आवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हातकणंगलेच्या विकासाचा पाया रचला व मजबूत बांधणी केली. विकासाची ही परंपरा आपल्याला अशीच पुढे न्यायची आहे हातकणंगले मतदारसंघाला सुजलाम सुफलाम करायचा आहे .

येणाऱ्या निवडणुकीत पक्ष संघटन मजबूत करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी आत्तापासूनच कामाला लागायचे आहे असे आवाहन यावेळी राजूबाबा आवळे यांनी केले.