विकासकामांच्या जोरावरच ही निवडणूक जिंकायची आहे: चंद्रदीप नरके

कोल्हापूर: चंद्रदीप नरके यांनी यवलूज जिल्हापरिषद मतदारसंघक्षेत्रात, कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नरके म्हणाले ,शेकडो कोटींचा निधी खेचून आणत आपण केलेली कामेच, आपल्याला लोकांसमोर घेऊन जायची आहेत. आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावरच आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. यासोबतच यावेळी निवडणुकांसंदर्भात विविध गोष्टींवर मार्गदर्शन केले.

 

 

यावेळी यवलूज जिल्हा परिषद मतदारसंघ कार्यक्षेत्रातील शिवसेनेचे पदाधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, महिला वर्ग, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकारआणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.