घोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू ,फार्मसी कौन्सिलचे विजय पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

अतिग्रे : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने एम.फार्म कोर्स -फार्मास्युटिक्स आणि फार्मास्युटिकल क्वालिटी ॲश्युरन्स असे दोन कोर्स सुरू करण्यास मान्यता दिली होती.या कोर्सचे उद्घाटन कौन्सिलचे सदस्य विजय पाटील यांच्या हस्ते झाले.

 

 

यावेळी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.फार्मसी व्यवसायाची सद्यस्थिती, उदयोन्मुख ट्रेंड आणि उद्योगाचे भविष्य,टीमवर्कचे महत्त्व आणि कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी निवडीचे निकष अधोरेखित केले. फार्मसी हे आरोग्य सेवेमध्ये आघाडीवर आहे अशा अभ्यासक्रमावर भर द्यायला हवा.हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रात योगदान देण्यासाठी तयार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

कुलगुरू प्रा.उद्धव भोसले यांनी फार्मास्युटिकल क्षेत्रातील पदवी, व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्य याचे महत्त्व पटवून दिले. यासाठी विद्यापीठाने सुरू केलेल्या फिनिशिंग स्कूल विषयी माहिती दिली. तसेच डीन डॉ. सुभाष कुंभार, डॉ.जीवन लवांडे, विभाग प्रमुख डॉ. विद्याराणी खोत यांनी हा कोर्स सुरू करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले.यावेळी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक उपस्थित होते.

यासाठी अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, डॉ. व्ही.व्ही कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी समर्थ व मुबिशिरीन इनामदार यांनी केले तर डॉ.कुंभार यांनी आभार मानले.