‘कृष्णराज महाडिक – द रायझिंग स्टार’ माहितीपटाचे अनावरण

कोल्हापूर : एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून मैदान गाजवलेल्या, प्रसिद्ध युट्युबर म्हणून लाखोंच्या मनात स्थान मिळवलेल्या आणि सामाजिक कार्याच्या वसा-वारशाला पुढे नेणाऱ्या युवा नेतृत्वाचा हा माहितीपट म्हणजे कृष्णराज महाडिक यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. कृष्णराज महाडिक केवळ क्रीडा क्षेत्रातच नाही तर समाजातील उपेक्षितांसाठी उभं राहून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

 

 

यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या आतापर्यंतच्या कार्यावर आधारित माहितीपट प्रसारित होत आहे. या माहितीपटाचे अनावरण राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.या अविस्मरणीय माहितीपटाचे पुढील अनेक भाग सोशल मीडियावर प्रसारित होणार आहेत.