संजय मंडलिक यांच्या हस्ते गोरंबे येथील पाझर तलावाचे पाणीपूजन

कोल्हापूर : गोरंबे,ता.कागल येथे संजय मंडलिक खासदार फंडातून गावातील पाझर तलावासाठी ९७ लाख रुपयाचा निधी लावून काम पूर्ण केले. तलाव पूर्ण शकमतेने भरला असून तलावाचे पाणीपूजन सोहळा संजय मंडलिक यांच्या हस्ते पार पडला.तसेच गावातील जवळ जवळ २०० एकर जमिनीसाठी या पाण्याचा वापर होईल.येणाऱ्या काळामध्ये या तलावाला पर्यटन स्थळ प्राप्त करून देण्याचा प्रयत्न मी करेन अशी ग्वाही संजय मंडलिक यांनी दिली.

 

 

यावेळी सरपंच सुनीता दत्तात्रय पाटील.. डे सरपंच सिद्राम ढोले. संचालक भगवान पाटील,आर एस पाटील,जयसिंग पाटील,दत्तात्रय दंडवते,अरुण ढोले,आनंदा बुडके ,केरबा पाटील,दगडू चौगुले व ग्रामस्थ उपस्थित होते