कोल्हापूरच्या सोनमचा रौप्य वेध

कोल्हापूर : नवी दिल्ली येथे ISSF विश्र्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवशी भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. 10 मीटर एअर रायफल गटामध्ये सोनम मस्कर रा.पुष्पनगर,गारगोटी यांनी रौप्य पदक पटकावले.

 

 

तिने 252 पूर्णांक 9 गुण मिळवले. या स्पर्धेत चीनच्या युतींग हुआंगने सुवर्ण तर फ्रान्सच्या ओसियन मूलरनं कास्य पदक पटकावले.