कोल्हापूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राहुल पाटील यांना पाठिंबा

कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [गवई ] कोल्हापूर यांचा राहुल पाटील यांना जाहीर पाठिंबा देत कार्यकर्ता मेळावा निवृत्ती संघ हॉल या ठिकाणी आयोजित केला होता. या मेळाव्याला विधानसभा निवडणूक संदर्भात पाठिंबा दिल्याबदल राहुल पाटील यांनी त्यांचे आभार मानले. व कार्यकर्त्यांचा संवाद साधला.

 

यावेळी जिल्हाअध्यक्ष पांडुरंग कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष निवास सडोलीकर , भिमराव कांबळे, R .S कांबळे, शशिकांत कांबळे , अशोक घाडगे,सर्जेराव कांबळे, शिवाजीराव पाटील , शिवाजी कारंडे मामा, सचिन चौगुले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..