शक्तिपीठ महामार्ग होऊच देणार नाही : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ संपर्क दौऱ्यावर असताना त्यांची गाडी एकोंडी ता. कागल येथील शेतकऱ्यांनी थांबवली. यावेळी मुश्रीफ यांनी गाडीतून उतरत शेतकऱ्यांशी चर्चा केली.

“शक्तिपीठ महामार्ग होऊच देणार नाही, मी शेतकऱ्यांसोबतच आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द न झाल्यास आमदारकीचाही राजीनामा देऊ” अशी ग्वाही हसन  मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना दिली.

यावेळी “शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे” या घोषणांनी परिसर दणाणला.