चंद्रदीप नरकेंच्या नेतृत्वाखाली पनोरे येथील कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर : आज पनोरे येथील उपसरपंच प्रवीण आबाजी कांबळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नरके म्हणाले, पक्षप्रवेशाच्या माध्यमातून,माझ्या नेतृत्वावर दाखवला जाणारा विश्वास जबाबदारी वाढवणारा असला तरी त्यापेक्षा कित्येक पटीने ताकद वाढवणारा आहे.

 

यावेळी लहु भाऊ पाटील , मानसिंग कांबळे, आर.डी.पनोरेकर, विनोद कांबळे, रमेश कांबळे, दगडू आवबा कांबळे, तुकाराम कांबळे, रमेश कांबळे, सुनील कांबळे, प्रमोद कांबळे, विलास कांबळे, सागर कुंभार, बळवंत चौगुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.