चंद्रदीप नरकेंच्या नेतृवाखाली भामटे येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर: आज भामटे येथील श्रीराम दूध संस्थेचे मा.चेअरमन व माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी हर्षद देसाई, सुरज देसाई, अरुण देसाई, जनार्दन खाडे, अशोक पाटील, शंकर पवार, प्रवीण चव्हाण, कृष्णात गुरव, वैभव मगदूम, बाबुराव साळुंखे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

 

 

यावेळी नरके म्हणाले, आमदार असतानाची कामे, सध्या आमदार नसताना मतदार संघात आणलेला विकास निधी, माझी सर्वसमावेशक काम करण्याची पद्धत यामुळे प्रभावित होऊन, लोकं शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत, मला जाहीर पाठींबा दर्शवत आहेत, हे पाहून काम करण्याला अजून जास्त ऊर्जा मिळत आहे.