आदित्य पाटील यड्रावकर यांच्या हस्ते हेरवाडमध्ये म्हाबुब सुबहानी पीर ऊरुसा निमित्त महाप्रसादाचे वाटप

कोल्हापूर : हेरवाड येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या म्हाबुब सुबहानी पीर यांच्या ऊरुसाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले.या धार्मिक सोहळ्यात विविध धर्मीय भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी महाप्रसादाचे वाटप शरद कारखान्याचे संचालक आदित्य पाटील(यड्रावकर) यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

 

सोहळ्यात आदित्य पाटील यांनी आपल्या भाषणातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले.“पीर म्हाबुब सुबहानी यांच्या विचारांचा वारसा जपणे ही आपली जबाबदारी आहे.विविध धर्मांतील एकोप्याचा सन्मान राखण्याचे कार्य आपण करत आहोत आणि ते वृद्धिंगत करणे हे काळाची गरज आहे.” त्यांनी सामाजिक सलोख्याचे महत्त्व अधोरेखित करत धार्मिक सहिष्णुतेचे पाऊल पुढे नेण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी गटनेते दिलीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य अफसर मकानदार,हयाचांद जमादार,सरदार जमादार,रावसाहेब पाटील,ऊरुस कमिटीचे अध्यक्ष जगौंड पाटील, उपाध्यक्ष सुरज कुन्नुरे यांच्यासह ऊरुस आयोजन समितीचे अन्य पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.