कोल्हापूर: किणी येथे 25 लाख रुपयांच्या रस्ता कामाचा आणि घुणकी येथे एक कोटी पाच लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आमदार राजूबाबा आवळे यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला.
गावकरी महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला सहभाग होता. यावेळी राजूबाबा आवळे यांनी सगळ्यांशी मनोभावे मन मोकळ्या गप्पा मारत गावच्या विकासासाठी नेहमीच कटिबंध असल्याचा विश्वास दिला.
तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादाच्या जोरावर माझी समाजकार्य सुरू आहे. भविष्यात सुद्धा जनसेवेचा वारसा असाच अविरतपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही सगळे एकदिलाने माझ्यासोबत उभा रहाल अशी मला खात्री आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी नागरिक, महिला, भगिनी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.