भारताची सात विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्ली : देशातील विमान कंपन्यांची सात विमाने बॉम्बने उडवून देण्याची धमकी मंगळवारी देण्यात आली. यात एअर इंडियाच्या शिकागोला जाणाऱ्या विमानाचाही समावेश आहे. विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच तपास यंत्रणांनी इशारा जारी करीत ही विमाने आपत्कालीन परिस्थितीत उतरवून घेतली. या पाचही विमानांना समाज माध्यम एक्सवर धमक्या मिळाल्या.

मुंबई येथून उड्डाण करणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. यातील शेकडो प्रवासी आणि विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना त्रास झाला होता. तपासणी केल्यानंतर ही अफवा असल्याचे सिद्ध झाले.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या जयपूर येथून अयोध्यामार्गे बंगळुरूला जाणारे विमान, स्पाईसजेटचे दरभंगा येथून मुंबईला जाणारे विमान, अकासा एअरचे सिलिगुडी येथून बंगळुरूला जाणारे विमान आणि एअर इंडियाच्या दिल्ली येथून शिकागोला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी समाज माध्यमांवर देण्यात आली. एअर इंडियाच्या विमानाची अयोध्या विमानतळावर तपासणी करण्यात आली.