कोल्हापूर: हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कागल शहरात नवीन शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम करणे 2 कोटी 69 लाख, प्रशासकीय भवन येथे रेकॉर्ड ऑफिस व कृषी कार्यालय बांधकाम करणे 3 कोटी 69 लाख व सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयासाठी नवीन इमारत बांधकाम करणे 2 कोटी 26 लाख या विकासकामाचा शुभारंभ सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम उप अभियंता सी. ए. पाटील, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय क. अभियंता ए. ए. लोंढे, विकास पाटील, हरुण मुजावर, किशोर सणगर, पंकज खलिफ, निकीता माने, विरेन माने व अविराज पिष्टे उपस्थित होते.