कागल : कागल मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातील वाड्या-वस्त्यांवर विकासाची गंगा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून साकारली आहे. रस्ते, पाणीपुरवठा योजना, समाज मंदिरे, वाचनालये, यासारख्या शेकडो विकासकामांनी गाव -खेडी समृद्ध बनली आहेत, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या गलगले पैकी दत्तनगर माळवाडी येथील अंतर्गत दत्त मंदिर सुशोभीकरण सोलर हायमास्टचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे संचालक व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी यावेळी येथील बांधकाम कामगारांना भांडी संचचे वाटप करण्यात आले.
नवीद मुश्रीफ पुढे म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर विकास कामांचा डोंगर रचला असून त्यांच्या या कार्याचा लौकिक पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील. उपसरपंच दत्तात्रय पाटील म्हणाले,शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गोरगरीब, दीनदलित, वंचित, उपेक्षित लोकांना लाभ देण्याचे कार्य मंत्री मुश्रीफ यांनी अविरतपणे केले आहे.
स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच सतीश घोरपडे यांनी केले. कार्यक्रमास कागल तालुका संघाचे संचालक डी. पी पाटील, माजी सरपंच काका पाटील, मारुती मगदूम, माजी सरपंच पांडुरंग कांबळे, बाळासाहेब पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार संदीप पाटील यांनी मानले.