विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, २० नोव्हेंबरला मतदान, २३ ला मतमोजणी

नवी दिल्ली : ज्या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते अखेर ती समीप घटीका आली असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ तारखेला मतमोजणी होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. त्यामुळे निवडणुकीसाठी आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. दिवाळीनंतर नवं सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे.

 

 

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आता १३ व्या विधानसभेला निरोप देऊन १४ व्या विधानसभेला सामोरं जाणार आहे. गेल्या दोन आठवड्यापासून निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर त्या तारखा आज जाहीर झाल्यात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. २० नोव्हेंबरला विधानसभेसाठीचं मतदान, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. संपूर्ण राज्यासाठी एकाच टप्प्यात हे मतदान होणार आहे. दि. २९ ऑक्टोबर ही अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे. छानणी ३० आक्टोबरला तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे.

🤙 9921334545