कोल्हापूर : कळंबा फिल्टर हाऊस (प्र. क्र. 68) येथे 25 लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विकासकामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकणे, मंदिर कंपाऊंड करणे या विकासकामांचा समावेश आहे.
याप्रसंगी माजी नगरसेवक दुर्वास कदम, अनिल शिंदे, पप्पू मणेर, मदन कोथळकर, सुमित बामणे, अभिजीत बारामते, राजेश सणगर, दिनकर मर्गज, सुरेश तलवार, सूर्यकांत धारगळकर, प्रकाश पिंपळे, अवधूत भोसले, शिवाजी सणगर, रवींद्र शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.