शौमिका महाडिक व चंद्रदीप नरकेंच्या हस्ते केर्ले येथील पतसंस्थेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील केर्ले इथल्या श्री चाळकोबा ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा शौमिका महाडिक व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पार पडला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या श्री चाळकोबा ग्रामीण सहकारी पतसंस्थेने अल्पावधीतच विश्वास निर्माण केला आहे. संस्थेचे हे कार्य कौतुकास्पद असून भविष्यात संस्थेने नवी क्षितिजे पादाक्रांत करावीत अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

 

यावेळी चाळकोबा उद्योग समूहाचे संस्थापक शामराव शिर्के, सहाय्यक निबंध करवीर (A.R) प्रेम राठोड,सहाय्यक निबंध करवीर संदीप पाटील, गोकुळचे संचालक एस.आर.पाटील, छ.राजाराम सह.साखर कारखान्याचे संचालक डॉ.एम.बी.किडगांवकर, श्री.दत्त सह.साखर कारखान्याचे संचालक कृष्णात जाधव, रामचंद्र माने, सुधाकर माने, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस डॉ.स्वाती पाटील, महिला मोर्चा पूर्व जिल्हा उपाध्यक्षा स्वाती तानवडे, मदन वरुटे,पांडुरंग गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545