कोल्हापूर :कामगार म्हणून सुरवात करताना स्वतः पुरस्कार्थी बनून न थांबता, संघटनात्मक बांधणी करून समाज अधिक बळकट करण्यासाठी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करत सुरेश केसरकर यांनी महाराष्ट्रात एक क्रांतीपर्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कामगार वर्ग हा समाजाचा प्रमुख घटक आहे.
पुरस्कार्थीनी हा पुरस्कार आपले अंतिम साध्य न मानता, यापुढेही उल्लेखनीय कार्य करावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. ते सोमवार १४ ऑक्टोबर रोजी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरीक सेवा संस्था यांचेवतीने आयोजित शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी त्यांच्या हस्ते प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या राजयोगिनी सुनंदा दिदी यांचा नागरी सत्कार तसेच ३९ राज्य व ३२ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराकरीता निवड झालेल्या पुरस्कार्थींना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व कोल्हापूरी फेटा देवून गौरविणेत आले.
यावेळी राजयोगीनी ब्रहमाकुमारी सुनंदा दिदीजी यांनी सत्काराला उत्तर देताना, जागतिक पातळीवर असलेली युद्धजन्य परिस्थिती, देशात वाढलेली अराजकता, कौटुंबिक कलह या सर्व समस्या मानसिक आरोग्याशी निगडीत आहेत. स्वतःला आध्यात्मिक प्रवाहात सहभागी करून मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केल्यास विश्वशांती निर्माण होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.
यावेळी सहा. कामगार आयुक्त विशाल घोडके, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, शिक्षक नेते भरत रसाळे, निर्मिती विचार मंचचे अनिल म्हमाने आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली. मान्यवरांमध्ये राजेंद्र निकम, संभाजी पवार, सचिन खराडे आदींचा समावेश होता.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले. आभार अनिता काळे यांनी मानले. सूत्रसंचालन स्वप्नील गोरंबे यांनी केले.
यावेळी ३६ जिल्ह्यातील असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, विभागीय प्रतिनिधी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गुणवंत कामगार उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होणे करिता संजय सासने, संभाजी थोरात, रूपाली निकम, अनिता काळे, शिवाजी चौगुले, महादेव चक्के, भगवान माने, सुभाष पाटील, संतराम जाधव, बाळासाहेब कांबळे, संजय गुरव, प्रविण भिके, बाजीराव हेवाळे, संदिप सुतार, सुनिल पाटील, धर्मेंद्र वंजिरे, बाजीराव हेवाळे, नारायण धनगर आदींनी विशेष परिश्रम घेतले.