ओबीसी बहुजन आघाडीच्या शाहूवाडी तालुकाध्यक्षपदी धनाजीराव गुरव

कोल्हापुर:शनिवार दसऱ्याचे सिमोल्लंघन करत शाहूवाडी तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांची व्यापक बैठक मलकापूर येथे पार पडली. सदरच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसींचा सहभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे अस्तित्व याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ओबीसी आरक्षणामधील घुसखोरी थांबवण्यासाठी विधानभवनात आपला आवाज उठवावा लागेल त्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक मोठ्या ताकतीने लढविण्यासाठी चा निर्णय घेण्यात आला.

 

याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात संविधानिक न्याय हक्क जनसंवाद यात्रा शाहूवाडीतून सुरू करण्याचा ठराव पास करण्यात आला. सदरच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी बहुजन पार्टीचे आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिगंबर लोहार होते.

सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन सुतार यांनी केले. जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार यांनी “ओबीसींनी राजकारणाकडे दुर्लक्ष केल्याने आपल्यावर अन्याय होत आहे.तसेच लोकोपयोगी विविध योजनांची सुरुवात ओबीसी करतात परंतु नंतर लाभाचे वेळी सधन वर्गच लाभार्थी होत असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी बोलताना ओबीसी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिगंबर लोहार म्हणाले ओबीसींनी स्वातंत्र्य नंतर स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात कधीही मतपेटीची लढाई लढली नाही. त्यामुळे ओबीसींचे गठ्ठा मतदान न झाल्याने सर्वच राजकीय पक्ष ओबीसींना जमेत धरून चालतात, त्यांना आवश्यक असणाऱ्या व भारतीय संविधानाने दिलेले न्याय हक्क अधिकार हिरावून घेत आहेत. साठ टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ओबीसींना विधानसभेत अत्यंत तुटपुंजे प्रतिनिधित्व देऊन बोळवण करत आहेत‌. शिवाय संबंधित पक्षांचा अजेंडा ओबीसींच्या हिताचा नसल्याने ओबीसींच्या भावी पिढ्यांचे भवितव्य संकटात आले आहे. भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी आपण मतपेटीची लढाई लढण्याआगत्येचे असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी सर्व संमतीने शाहुवाडी तालुका ओबीसी बहुजन आघाडीच्या अध्यक्षपदी शाहूवाडी मधील सक्रिय कार्यकर्ते धनाजीराव गुरव यांची निवड करण्यात आली. तसेच आदर्श शिक्षक संभाजीराव लोहार सर यांचा सत्कार करण्यात आला. शाहूवाडी तालुका दौऱ्यावर आलेल्या जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार यांचाही फेटा घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी पांडुरंग लोहार संभाजी लोहार, अशोक लोहार ,किरण सुतार, सदाशिव सुतार सुनील जाधव बाबुराव सुतार, चंद्रकांत कुंभार महेश कुंभार,आकाश सुतार केशव सुतार आपटे मॅडम सरदार झेंडे, बाजीराव झेंडे इत्यादी उपस्थित होते. शेवटी आभार श्री कुंभार यांनी मानले.