आमदार सतेज पाटील ,आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उचगावात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर: उचगाव येथील मणेर मळा, यादववाडी येथील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यांचं हलगी, तुतारी, ढोल ताशाच्या गजरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. या विकासकामा मध्ये उचगाव इथं छत्रपती शिवाजी चौक इथं दोन कोटी 50 लाख निधी खर्चून तयार करण्यात आलेल्या 23 फूट रुंदीचा काँक्रीट रस्ताचे लोकार्पण सोहळा पार पडला. आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते फित कापून याचं उद्घाटन करण्यात आलं.

 

यानंतर यादववाडी इथं एक कोटी निधीतून निर्माण करण्यात आलेल्या मॉडेल स्कूलचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं. या मॉडेल स्कुलमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड युक्त डिजिटल क्लासरूम, टर्फ ग्राउंड, शाहू बालकला मंच व्यासपीठ आदींचा समावेश आहे. यावेळी विद्यार्थ्यानी स्वागत गीत आणि लेझीमचं सादरीकरण केलं. शाळेचे मुख्याध्यापक ए.के. पाटील यांनी प्रास्ताविकेत या मदतीसाठी आभार व्यक्त केलं. आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील अनेक मान्यवरांचा सत्कार आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, उद्याची पिढी घडवणारी आदर्श शाळा, अद्ययावत शाळा निर्माण करता आली याचा मनस्वी आनंद असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यापुढं सुद्धा गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार ऋतुराज पाटील यांनी, मणेर मळा ते उचगाव हा रस्ता व्हावा हे अनेकांची इच्छा होती. सध्या गावाची लोकसंख्या वाढत आहे, नागरिकरण झपाट्यांनं होत आहे. हा मुख्य रस्ता पूर्ण केला याचा आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं. यासह झेडपी शाळा टिकली पाहिजे, वाढली पाहिजे म्हणून एक कोटी निधीतून शाळा अत्याधुनिक करण्यासाठी योगदान देता आलं यांचा मनस्वी आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं. येणारी पिढी घडली तरच देश पुढं जाईल हीच भूमिका घेऊन आम्ही काम करत आहोत असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. गावाने नेहमीच आम्हाला साथ दिली आहे, आधार दिला आहे, पुढच्या काळात सुद्धा तुमची साथ लाभेल आणि अशाच पद्धतीचे विकास कामे आमच्या हातून होत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संजना बनसोडे, श्रीधर कदम, सरपंच मधुकर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी उपसरपंच तुषार पाटील, गोकुळ चे संचालक बाबसाहेब चौगुले, प्रकाश पाटील, उद्योजक तेज घाटगे, कावजी कदम, सुनिल पोवार, प्रवीण केसरकर, अशोक निगडे, गोपाळशेठ मणेर, सचिन देशमुख, सचिन गाताडे, श्रीधर कदम, वैजयंती यादव, श्यामराव यादव, कीर्ती मसुटे, महेश जाधव, रवी काळे, करवीर गट शिक्षणाधिकारी समरजित पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, भागातील सर्व तरुण मंडळ, महिला बचत गट, जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.