खा.धनंजय महाडिक यांचे राजेश क्षीरसागरांना प्रत्युत्तर

कोल्हापूर : शिंदे गटाचे नेते व राज्य नियोजन गटाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

धनंजय महाडिक म्हणाले, भाजपने पहिल्यापासूनच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. पोटनिवडणुकीत आम्हीही जागा लढवली असून 80 हजार मतदान घेतले आहे. राजेश क्षीरसागर यांनी घेतलेला मेळावा कोणावर दबाव टाकण्यासाठी असू नये, क्षीरसागर दक्षिण मध्ये आमची पंधरा हजार मत आहेत असं म्हणत असतील तर आमची उत्तर मध्ये 80 हजार मते आहेत. एकमेकांना सोबत घेऊन गेलो तरच आपण जागा निवडून आणू शकतो निवडणुकीच्या तोंडावर गैरसमज होणारे मेळावे होऊ नयेत, असा टोला महाडिक यांनी क्षीरसागर यांना लगावला.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीकडे 58 पैकी 41 जागा आहेत. 48 ते 49 जागा निवडून येतील असा आमचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूर मधील दहापैकी चार जागा भाजपने लढवाव्यात अशी विनंती आम्ही केली आहे, असे आमचे प्रयत्न असल्याचे भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे.

महायुतीच्या जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. भारतीय जनता पार्टीने आपल्या पदाधिकाऱ्यांना बोलवून आढावा घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता येत असताना अजित पवार यांचा वाटा मोठा असेल असे ही धनंजय महाडिक यांनी सांगितले