तासिका तत्वावर अध्ययन करणाऱ्या प्राध्यापकांना सुधारित मानधन लागू करण्यात आले; म.न.वि.सेच्या मागणीला यश

 

कोल्हापूर : अध्यापकांना सुधारित मानधन लागू होण्यासाठी सर्व महाविद्यालयांना आस्थापनाना परिपत्रक काढून नवीन सुधारित दर देण्याबाबत सूचना कराव्या या मागणीचे निवेदन उच्च व तंत्र शिक्षण कोल्हापूर विभागाचे विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून देण्यात आले होते.

 

 

 

या मागणीला यश आले असून , तासिका तत्वावर अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांना शासन निर्णय दि .२७-०३-२०२३ प्रमाणे कोल्हापूर विभागातील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना सुधारित मानधन अदा करण्याचे परिपत्रक विभागीय संचालक उच्च शिक्षण व तंत्र विभाग अधिकारी डॉ. धनराज नाकाडे यांनी सर्व महाविद्यालयांना आदेश दिले.