विशेष कार्यकारी अधिकारी हे जनसेवा करण्याचे महत्त्वाचे पद : राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर : विशेष कार्यकारी अधिकारी हे जनसेवेचे एक महत्त्वाचे पद आहे, ज्याच्या माध्यमातून सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.गेल्या २० वर्षापासून या पदापासून वंचित असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना मानाचे पद मिळाल्यामुळे त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या पदाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील नागरिकांची आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.त्यांना याचबरोबर शांतता प्रस्तापित करण्यासाठी शासकीय कमिटीवरती काम करता येणार आहे.त्यामुळे शिरोळ तालुक्यातील ३७० जणांना विशेष कार्यकारी अधिकारी पद देवून जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

 

प्रारंभी बबन यादव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.यावेळी सतिश मलमे,बाळासाहेब कोकणे,भोला कागले,शिवाजी दळवी,रमेश भुजगडे,बाबासाहेब बागडी,दशरथ काळे,प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिरोळ तालुक्यातील येणाऱ्या पिढीला सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी गेल्या साडेचार वर्षांपासून आमच्या हातून प्रयत्न झाले आहेत.या प्रयत्नांमुळे युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.युवकांच्या रोजगाराबरोबरच तालुक्यातील तळागाळातील विकास कामांसाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे.

यावेळी अक्षय आलासे,आदिनाथ आरबाळे,रामचंद्र मोहिते,बाबा पाटील,विजितसिंह देशमुख,यड्रावचे सरपंच कुणालसिंह निंबाळकर,सईद पटेल,अफसर पटेल,नंदकुमार पाटील, अलकाताई खाडे,माधुरी टाकारे, संभाजी गोते,फजलेअली पटेल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.