सतेज पाटील यांच्या उपस्थितीत सांगवडेवाडीत विविध विकासकामांचे उद्घाटन

कोल्हापूर : सांगवडेवाडी या विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये 1 कोटी 90 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

या उद्घाटन सोहळ्याला सरपंच सुदर्शन खोत, उपसरपंच अनिकेत जाधव, शशिकांत खोत, बाबासो चौगुले, प्रकाश पाटील,  वंदना पाटील, शोभाताई राजमाने, मोहन खोचगे, निखिल पाटील, बाबासो खोत, कुमार खुडे, पोपट सिद्धनुर्ले, बाबु आंगणे, अनिल चव्हाण, भुजगोंड पाटील, प्रदिप झांबरे, अलका शिंदे, सपना चौगुले,गौराबाई खोचगे, सुनिता खुडे, सुषमा वडर, शितल खोत यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.