भुदरगड तालुक्यातील विविध योजनांचा लाभ झालेल्या लाभार्थ्यांना प्रकाश आबिटकरांच्या उपस्थितीत मंजूरी पत्रांचे वाटप

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ, प्राधान्य लाभार्थी कुटुंब रेशनकार्ड, गोटा व शौचालय यासह विविध योजनांचा लाभा झालेल्या लाभार्थ्यांना मंजूरी पत्रांचे वाटप प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थित करण्यात आले.

 

 

अशक्य असे काहीच नसते पण ते काम मोठ्या कष्टाने काम केल्यास यशस्वी होतेच आजची ही गर्दी त्याचीच साक्ष देते आहेत. आयुष्याच्या उत्तरार्धात पेन्शनचा आधार मोठा ठरतो आणि हे पुण्याईचे काम आपल्या हातुन होत असल्याचे समाधान होत आहे. असे प्रकाश आबिटकर म्हणाले.

तहसीलदार अर्चना पाटील, संजय गांधी समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील, नायब तहसीलदार सुशांत कांबळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव चौगले, धनाजी देसाई , वसंतराव प्रभावळे, माजी उपसरपंच अरुणराव शिंदे, श्रीधर भोईटे, तानाजीराव जाधव, के.पी.जाधव, पांडूरंग कांबळे, स्मिता चौगले, संजय देसाई, उपसरपंच सागर शिंदे, युवासेना प्रमुख विद्याधर परीट, बसरेवाडी सरपंच संदीप पाटील, राजाराम भराडे, रणधिर शिंदे, शरद मोरे, संदीपराज पाटील, उमाजी पाटील, मारुती भराडे, बाळ देसाई, के.बी.देसाई, नाना पाटील, सचिन गुरव, युवराज फगरे यांच्यासह प्रमुख मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.