हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश

 

पुणे : हर्षवर्धन पाटील यांनी आज सोमवारी (दि. 7 ऑक्टोबर) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशावेळी हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना मदत केल्याचे स्पष्ट केले. खासदार शरद पवार यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश केला आहे.

 

यावेळी,खासदार सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल ओले यांच्यासह शरद पवार गटाचे नेते मंडळी उपस्थित होते.