कोल्हापूर : संकल्प करवीर पदयात्रा आज राहुल पाटील यांच्या मुळ गावी सडोली खालसा येथे पोहचली. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या आपुलकीने यात्रेचे स्वागत केले. यावेळी गावतील श्री गणेश मंदिर, जोतिबा मंदिर आणि हनुमान मंदिर या देवस्थानांना भेट देवून ग्रामदेवतांचे आशीर्वाद घेतले.
तसेच स्वातंत्र्योत्तर काळात, गावात आपल्या सामाजिक कामातून ज्यांनी गावाला विकास व समृद्धीचा वारसा दिला असे, हरी रामजी पाटील आणि रामचंद्र बाबूराव पाटील यांच्या पुतळ्यास ग्रामस्थांसमवेत अभिवादन केले.
स्व. आ. पी. एन. पाटील साहेब यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी ग्रामस्थ मंडळींच्या भेटीने राहुल पाटील यांना कौटुंबिक स्नेहभेटीचा अनुभव आला. यावेळी ग्रामस्थांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
यात्रेत राहुल पाटील यांची सहचारिणी तेजस्विनी राहुल पाटील या देखील उपस्थित होत्या. यात्रेचे स्वागत करत असताना सरपंच अमित पाटील व त्यांचे सहकारी, कॉंग्रेस तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व गावकऱ्यांचे आशीर्वाद घेत, यात्रा नवीन संकल्प आणि ऊर्जेसह पुढे मार्गस्थ झाली